Share

“बिन बुलाये पाकिस्तान्यांसोबत बिर्याणी खायला भीती नाही वाटत पण..” भाई जगताप यांचा मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) पंजाब दौऱ्यावेळी त्यांचा ताफा निदर्शकांनी तब्बल १५ ते २० मिनीटे अडवल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधांनांना आपला दौरा रद्द करावा लागला. मोदींचा ताफा जिथे थांबला तिथून पाकिस्तान फक्त २० किमी अंतरावर होते. त्यामुळे हा कॉंग्रेसचा घातपाताचा डाव होता, असा आरोप भाजपने केला आहे. आता असे असतानाच काँग्रेस नेते भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी ट्वीट करत मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

‘बिन बुलाये पाकिस्तान्यांसोबत बिर्याणी खायला भीती नाही वाटत मग आपल्याच शेतकऱ्यांसोबत १५ ते २० मिनिटे थांबायला  भीती का वाटते?’ असा खोचक सवाल करत भाई जगताप यांनी मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

दरम्यान भाजपने केलेल्या आरोपाचे कॉंग्रेसने खंडन केले आहे. पंतप्रधान मोदींचा निदर्शकांमुके ताफा १५ ते २० मिनीटे अडकला. असा आरोप भाजपने केला आहे. मात्र कॉंग्रेसने या ठिकाणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात निदर्शक नाही तर भाजप समर्थकांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. यावरूनच कॉंग्रेसने भाजपचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. भाजप समर्थक भाजपचे झेंडे घेऊन मोदींच्या नावाचा जयघोष करतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे भाजपने पंजाबच्या जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, मात्र पंजाब माफ करणार नाही. असा इशाराही काँग्रेसने आपल्या अधिकृत काँग्रेस पेजवर ट्वीट करत दिला आहे.

पाहा तो व्हिडिओ-

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!