🕒 1 min read
मुंबई: बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध कलाकारांच्या घरी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तापसी पन्नू, अनुराग कश्यप, मधु मेंटेना,विकास बहल यांच्या घरी छापेमारी आयकराने सकाळी छापेमारी केली आहे. कर प्रकरणामध्ये छापेमारी करण्यात आली आहे असं सांगण्यात येतंय.
‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली गेली. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या.आयकर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कर चोरी प्रकरणी या अभिनेत्यांवर छापेमारी करण्यात आली.
3 days of intense search of 3 things primarily
1. The keys of the “alleged” bungalow that I apparently own in Paris. Because summer holidays are around the corner— taapsee pannu (@taapsee) March 6, 2021
फँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती क्षेत्रातील खासगी कंपनी आहे. तिची स्थापना २०१० मध्ये झाली. अनुराग कश्यप, विकास बेहेल, मधू मंटेना यांनी फँटमची उभारणी केली. चित्रपट निर्मिती आणि वितरणाचं काम फँटम कंपनी करते. अनुराग कश्यप या कंपनीचा मालक आहे. विकास बेहेल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानं २०१८ मध्ये त्याची फँटममधून हकालपट्टी करण्यात आली. मार्च २०१५ मध्ये कंपनीतील ५० टक्के हिस्सा रिलायन्स इंटरटेनमेंटनं खरेदी केला.
3. My memory of 2013 raid that happened with me according to our honourable finance minister ????????
P.S- “not so sasti” anymore ????????♀️
— taapsee pannu (@taapsee) March 6, 2021
यावर आता अभिनेत्री तापसी पन्नू हिने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर लिहिताना तिने म्हटले आहे की, “३ दिवसांच्या शोधात प्रामुख्याने ३ गोष्टींचा समावेश आहे. १. पॅरिसमधील माझ्या मालकीचा असलेला ‘कथित’ बंगला कारण की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. २. मी याआधीच नाकारलेल्या ५ कोटी रकमेची “कथित” पावती. ३ सन्माननीय अर्थमंत्र्यांनी दिलेल्या वृत्तानुसार २०१३ मधील माझ्यावर टाकलेल्या छापाची आठवण. ” असे तीन म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पालकमंत्री देसाई दोन दिवसात घेणार शहरातील पाणीटंचाई निवारणासाठी बैठक
- मराठवाड्यात ऑक्सिजन टँक वाढवण्याच्या विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकरांच्या सूचना
- स्वॅब न देताच रुग्ण येत आहेत कोरोना पॉझिटिव्ह; बुलढाण्यातील अजब प्रकार समोर !
- टीसीच्या नोकरीचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणाचा तिघांना १६ लाखांचा गंडा
- औरंगाबादकरांनो काळजी घ्या! २४ तासांत ४५९ नव्या रुग्णांची नोंद; पाच जणांचा मृत्यू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
