Share

पुणे शहर काँग्रेस मध्ये आघाडी करण्याबाबत संभ्रम

Published On: 

पुणे : येत्या काही दिवसातच पुणे मुंबईसह राज्यातील १० महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. पुणे शहर हे मागच्या दोन वर्षात एकूण ३४ गाव नव्याने समाविष्ट झाल्याने राज्यातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं शहर झालं आहे. पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्र राज्यातील आकारमानाने सर्वात मोठी महानगरपालिका आहे. गेल्या २ वर्षात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे सर्वात जास्त राजकीय फायदा कुठल्या पक्षाला झाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. पुणे शहराच्या उपनगरात आणि शहरालगतच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद गेले कित्येक वर्ष अबाधित आहे.

त्यात ही एकूण ३४ गाव नव्याने पुणे शहरात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाहुंमध्ये अधिकच बळ संचारले आहे. पुणे महानगरपालिकेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी दोन हात करायला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात इच्छुक पक्ष आहे, कारण शिवसेनेची पुणे शहरात फारशी ताकद नाही.

तर काँग्रेस पक्ष पूर्वीइतका पुणे शहरात ताकदवान नाही. त्यातच काँग्रेस पक्ष आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवायची कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर युती करून लढवायची या कोड्यात सापडला आहे, कारण काँग्रेस पक्षाकडे आता पुणे शहरात पूर्वी इतकी ताकद उरली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आता विश्वास राहिला नाही. एकेकाळी पुणे शहरात व महापालिकेतही वर्चस्व असलेल्या काँग्रेसची आजची राजकीय अवस्था तशी नाही. १६४ नगरसेवकांच्या सभागृहात काँग्रेसचे फक्त १० नगरसेवक आहेत. आता तर नव्या प्रभागरचनेत सर्व मिळून १७३ नगरसेवक असणार आहेत. २३ गावे महापालिकेला जोडली गेली आहेत. स्थानिक नेत्यांमध्ये मतभेद आहेत.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!