Share

सूर्यकुमार यादवने टाकले नवजोत सिंग सिद्धूला मागे, केला अनोखा विक्रम…

Published On: 

अहमदाबाद : भारत मायदेशात जवळपास एक वर्षाने एकदिवसीय मालिका खेळत आहे. वेस्टइंडीज संघ मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे, वेस्टइंडीजच्या या भारत दौऱ्यात ३ एकदिवसीय सामने अहमदाबाद येथील श्री.नरेंद्र मोदी या क्रिकेट मैदानावर खेळवले जाणार आहेत. तर तीन टी-२० सामने कोलकत्ता येथील ईडन गार्डनवर खेळवले जाणार आहेत. काल झालेल्या पहिल्या भारत विरुद्ध वेस्टइंडीजमधील एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्टइंडीजचा ६ गडी राखून धुव्वा उडवला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि तो चांगलाच यशस्वी देखील झाला. युझवेंद्र चहेलच्या प्रभावी फिरकी माऱ्यासमोर वेस्टइंडीजच्या फलंदाजांचा निभाव लागला नाही.

तर भारत जेव्हा फलंदाजीस आला तेव्हा भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने ५१ चेंडूत ६० धावांची तडाखेबाज फलंदाजी केली. तर पहिल्या सामन्यात भारत देशात सर्वात जलद ५००० धाव करणारा विराट कोहली हा पहिला भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला. त्याने केवळ ९६ डावात भारतात ५००० एकदिवसीय धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा १२१ डावात ५००० धावांचा विक्रम मोडला. तर याच वेस्टइंडीज विरुद्ध भारत या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव याने देखील एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला. सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील पहिल्या पाच डावांमध्ये ३०+ धावा करण्याचा विक्रम केला आहे. त्याने आतापर्तंत पाच डावांत ३१*, ५३, ४०, ३९ व ३४* अशी कामगिरी केली आहे. वन डे क्रिकेट इतिहासात पहिल्या पाच डावांमध्ये ३०+ धावा करणारा तो भारताचा पहिला व जगातील पाचवा फलंदाज बनला आहे.

याआधी इंग्लंडचा जो रूट, पाकिस्तानचा फाखर जमान, नेदरलँड्सचा रियान डॅस कँटे व ऑस्ट्रेलियाच्या टॉम कूपर यांनी असा पराक्रम केला आहे. सूर्यकुमारने यासह माजी सलामीवीर नवज्योतसिंग सिद्धूचा विक्रम मोडला. सिद्धूने सलग ४ डावांमध्ये ३०+ धावा केल्या होत्या.

       महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!