पुणे : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे काल वयाच्या ९३ व्या वर्षी न्यूमोनियामुळे मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. भारतातीलच नव्हे तर जगभरातील अनेक संगीत प्रेमींच्या हृदयावर त्यांच्या आवाजाने जादू केली होती. त्यांच्या जाण्याने लाखो जणांचा आधार हरपल्याची भावना सध्या जगभरात निर्माण झाली आहे. त्या जश्या संगीतामधून आधार द्यायच्या तश्याच प्रकारे त्यांनी पुणे शहरात ”दीनानाथ रुग्णालय” चालू केले होते. या रुग्णालयाचे उदघाटन २००१ मध्ये भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले होते.
लता मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनकडून चालवल्या जाणाऱ्या या रुग्णालयाने लता मंगेशकर यांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्य सरकारने आज सार्वजनिक सुट्टी दिली असून देशात दोन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबियांद्वारे उभारण्यात आलेल्या पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानिमित्त आज म्हणजेच सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी बाह्य रुग्ण विभागातल्या एकाही रुग्णाकडून तपासणी फी घेतली गेली नाही. सर्व रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. रुग्णालयाच्या प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. हे रुग्णालय मंगेशकर मेडिकल फाऊंडेशनतर्फे चालवण्यात येत आहे. १९८९ मध्ये मंगेशकर भावंडांनी लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली. भेदभाव न करता उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा देणे या ध्येयाने लता मंगेशकर फौंडेशनने पुण्यात दीनानाथ रुग्णालय सुरु केले होते. स्वतः लता मंगेशकर या आवर्जून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या कामकाजात जमेल तस लक्ष घालत असत.
महत्वाच्या बातम्या :
- Amit Shah on Owaisi attack : अमित शहांचे असुउद्दिन ओवेसी यांच्यावरील हल्ल्यावर निवेदन
- तेव्हा लता मंगेशकर म्हणाल्या होत्या मी मुंबई सोडून जाईन
- किरीट सोमय्यांनी उगाच राजकीय नौटंकी करू नये- अनिल परब
- “मोठा दगड आणि…”, किरीट सोमय्यांनी शेअर केला ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ
- असदुद्दीन ओवेसींवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अमित शहा करणार संसदेत निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

