Share

भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेला इशारा…

Published On: 

पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी किरीट सोमय्या यांच्यावरील पुणे महानगरपालिकेच्या आवारात झालेल्या जीवघेण्या हल्ल्यावरून शिवसेनेला सज्जड दम दिला आहे. किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत शिवसैनिकांनी हल्ला केला असता किरीट सोमय्या पुणे मनपा भवनाच्या पायऱ्यांवर तोल जाऊन पडले आणि जखमी झाले. शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर केलेल्या हल्ल्याचे सर्व पुरावे समोर असताना देखील सरकार किंवा पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीये. त्यामुळे भारतीय जनता पक्षातर्फे सर्व हिशोब चुकते केले जाणार असल्याची धमकी आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुण्यात आज पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी शिवसेनेला धमकी वजा इशारा दिला. तसेच किरीट सोमय्या हल्लाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून सर्व पुरावे देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळीज चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले कि, ”किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यात पुणे पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले आहेत, ते अतिशय हास्यास्पद आहेत. या घटनेचे सर्व पुरावे उपलब्ध आहेत. पण तरीही पुणे पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद न करणं, यातून पुणे पोलिसांवर दबाव असल्याचंच सिद्ध होतं. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला असून, सर्व पुरावे दिले आहेत. तसेच या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे.

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यामागे कोण आहे हे सर्वांना ठाऊक आहे. किरीट सोमय्या ज्यांच्या बद्दल निवेदन द्यायला पोलिसांकडे जाणार होते त्यांची पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते मुद्द्यांवरून गुद्द्यांवर आले आहेत. पण केंद्रीय तपास यंत्रणा कोणत्याही क्षणी त्यांच्या दारापाशी येणार असून त्यांनी केलेली भ्रष्टाचाराची प्रकरणे हळू हळू का होईना नक्क्कीच बाहेर पडतील.

 महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!