Share

गुरमित राम रहीमला २१ दिवसांची रजा  

Published On: 

🕒 1 min read

चंडिगढ: पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीम याला २१ दिवसांची तुरुंगातील रजा (Furlough) मिळाली आहे. बाबाचे अनुयायी पंजाब तसेच उत्तर प्रदेश मध्ये मोठ्या संख्येने आहेत. बाबा सध्या हरियाणा राज्यातील रोहटक येथे स्थित सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. २७ फेब्रुवारी पर्यंत त्याला तुरुंगातील रजेवर बाहेर सोडणार आहेत.

आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाबाच्या या रजेवर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. याप्रकरणी हरियाणा राज्य सरकारने याला कैद्याचा अधिकार असे म्हंटले आहे. कैद्याला काही दिवसांची रजा हा त्याचा सांविधानिक अधिकार आहे. यात सर्व काही कायदेशीर पद्धतीने झाले असून कोणत्याही कैदयाने तीन वर्षे तुरुंगात काढल्यावर त्याला अश्या प्रकारची रजा देता येते असे देखील म्हंटले आहे. अश्या प्रकारचा अर्ज असल्यावर त्याला मान्यता देणे न देणे हे सर्व तुरुंग अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाच्या हातात असते असे मत मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी पत्राकरांसशी बोलताना सांगितले.

तसेच या रजेचा आगामी निवडणुकांशी कोणताच संबंध नसल्याचे तुरुंगांधिकारी रणजित सिंह यांनी सांगितले. रजेच्या कालावधीत बाबा राम रहीम, सिरसा येथे पोलिसांच्या नजरकैदेत रहाणार आहे. यापूर्वी राम राहीमला त्याच्या आईच्या आजारपणाच्या कारणाने १७ मे २०२१ रोजी रजा मिळाली होती.

१९४८ साली शहा मस्ताना यांनी डेरा सच्चा सौदाची स्थापना केली होती. १९६० साली शहा सतनम यांनी  डेराची सूत्रे सांभाळली होती. सन १९९० साली वयाच्या २३ व्या वर्षी राम रहीम हा डेराचा प्रमुख झाला होता. काही जवळच्या लोकांसोबत राम राहीमने २००६ आणि २००७ साली  एक राजकीय गट तयार केला. ४५ लोकांची ही समिती प्रत्येक राज्यात राजकीय घडामोडी आणि राजकारण यात सक्रिय होती. २००७, २०१२ आणि २०१७ च्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत डेरा आणि राम रहीमने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत डेरा आणि राम राहीमने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!