🕒 1 min read
नांदेड : नांदेडमध्ये संतापजनक प्रकार समोर आला आहे. जनावरे चोरीच्या संशयावरून तिघांना रात्रभर बेदम मारहाण केल्याची घटना 27 जानेवारी रोजी रात्री घडली होती. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी 31 जानेवारी रोजी सात जणांविरुद्ध इतवारा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आली आहे.
या प्रकरणाविषयी अधिक माहिती अशी की, देगलूर नाका परिसरातील मोहम्मद वाजिद कुरेशी मोहम्मद बाबू कुरेशी हा मजूर 27 जानेवारी रोजी राञी 8.30 वाजता अजिमोद्दीन डिलक्स फंक्शन हॉलसमोर थांबला होता. यावेळी दुचाकीवर आलेल्या मो.आयुब मो.जान व अब्दुल जब्बार अब्दुल एकबाल यांनी तुला बोलायचे आहे, असे सांगून दुचाकीवर इदगाह कमानीच्या पुढे नदीकाठी घेवून गेला. यावेळी तेथे मोहम्मद आमेर, इग्राण मन्नान, आयुबचा भाचा, नोकर आदी या ठिकाणी हजर होते. यावेळी आरोपींनी संगनमत करुन तू आमची जनावरे चोरी करतो आहे, असा आरोप करून मोहम्मद वाजिद यास लाकडाने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले.
मारहाणीचा हा प्रकार दुसऱ्या दिवशी (28 जानेवारी) पहाटे 3 वाजेपर्यंत सुरू होता. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलिसांनी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या फान व्हायरल होत असून या प्रकरणी संताप व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
- ‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका; जयंत पाटील कडाडले
- डांबरी रस्त्यांना सेनेचाच विरोध,’रस्ता खराब झाल्यास लोक शिव्या घालतात’-खैरे
- ‘नगरपालिका-नगरपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी जागा उपलब्ध करुन देणार’
- ‘मनसेचे आंदोलन म्हणजे नौटंकी’, चंद्रकांत खैरेंची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
