Share

आम्ही तीनही राजे एकच आहोत, त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच नाही – संभाजीराजे

Published On: 

पुणे : मराठा आरक्षणासह कष्टकऱ्यांचा लढ्यासाठी सतत झगडणारे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून ते मराठा आरक्षणासह, कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणार आहेत. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फाऊंडेशनचे सातारा येथे नुकतेच उद्धाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभाला खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.

साताऱ्यातील या कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले एकत्र आले होते, तिन्ही राजे एकत्र येणार का हा असा प्रश्न खासदार संभाजीराजे यांना विचारला असता, आम्ही तीनही राजे एकत्रच आहोत, सगळ्यांची भूमिका एक आहे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सातारा आणि कोल्हापूर या गाद्या वेगळ्या नाहीत आम्ही एकत्रच आहोत, एकत्र येण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत त्यांनी विषयाला बगल दिली. ते पुण्यात बोलत होते.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत, हा विषय न्यायप्रविष्ठ आहे, ५ फेब्रुवारीला मराठा आरक्षणावरती सुनावणी होतीये, या सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल.५ फेब्रुवारीपर्यंत वाट पाहणं आवश्यक आहे. औरंगाबादला मी जाणार होतो, मात्र काही कारणामुळे जाता आलं नाही. आंदोलन मागे घेतलं नसेल तर मागे घ्यावं अशी मी विनंती करतोय, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!