मुंबई : सध्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र पुराने त्रस्त झाला आहे. अनेक दुर्घटना देखील झाल्या. त्यात १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अनेक मंत्र्यांनी दौरे केले. केंद्राकडून पाहणी करण्यासाठी नारायण राणे यांना पाठवण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंने देखील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांची सांगलीतील पाहणी खरब हवामानामुळे रद्द करण्यात आली. या पूर परिस्थितीमुळे भाजप सातत्याने शिवसेनेवर टीका करत आहे.
आज भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणल्या,’सर्वज्ञानी संजय राऊत आपल्या प्रात: सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत’ असे त्या म्हणाला. त्यांचा आरोप आहे की दुर्घटने नंतर माध्यमे तत्काळ तेथे पोहोचली मात्र, मुख्यमंत्री तब्बल १६ तसा नंतर तेथे आले.
दरम्यान चित्रा वाघ यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकत जाधवांवर आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्या म्हणल्या, ‘चिपळूण येथील नागरिकांवर पावसामुळे अस्मानी संकट कोसळलयं मात्र स्थानिक आमदार भास्कर जाधव यांची चिपळूण येथील पूरग्रस्त महिलेशी केली उर्मट दादागिरी समोर आली आहे, अशी ही वागणूक अत्यंत चुकीचीचं. पूरग्रस्त नागरिकांना धीर देण्याऐवजी मुख्यमंत्रींना खुश करण्यासाठी केलेलं कृत्य निषेधार्हच आहे’ तसेच पुढे त्या म्हणाल्या,’माझी कोकणातील भगिनी आपल्या समोर व्यथा मांडण्यासाठीच येत होती ना. तिचे अश्रू पुसणे सोडा तिच्यावरती हात उचलला जातोय हा ‘पुरूषार्थ’ दाखवल्यामुळे धन्य झाले असतील बाळासाहेब’ अशा जहरी शब्दात त्यांनी जाधवांवर टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे : 28 जुलै रोजी फेरफार अदालतीचे आयोजन, जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’ आवाहन
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
