पुणे : लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेतून फेरफार अदालती मंडळ स्तरावर दर महिन्याच्या दुस-या बुधवारी घेऊन जनतेच्या प्रलंबित साध्या वारस तक्रारी नोंदी निर्गत करणेच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. तथापि कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे माहे मार्च 2021 नंतर अद्याप फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आलेले नाही. कोविड 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्याने या महिन्यात चौथ्या बुधवारी 28 जुलै 2021 रोजी फेरफार अदालत आयोजित करणेबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड बाबतच्या नियमांचे पालन करुन पुणे जिल्हयातील सर्व तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर जुलै 2021 मधील फेरफार अदालत 28 जुलै 2021 रोजी आयोजित केली जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- देशवासियांची माफी मागणाऱ्या तलवारबाज भवानी देवीला पंतप्रधानांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान दुर्दैवी
- आसाम मिझोराम सीमावादातून हिंसाचार, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू
- ‘शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत रिंग रोडची मोजणी करून देणार नाही’
- ‘मुंबई इंडियन्स ते कसोटी संघात स्थान’ अवघ्या पाच महिन्यात बदलली सुर्याचे कारकिर्द

