Share

आता गुजरातमधील रिलायन्सच्या प्रकल्पातून राज्याला मिळणार अतिरीक्त ऑक्सिजन

Published On: 

मुंबई : राज्यात काेरोना रुग्ण संख्येत होत असलेली वाढ पाहता, राज्यात ऑक्सिजन पुरवठा कमी पडत आहे. ऑक्सिजन पुरवठा झाला नसल्याने राज्यातील अनेक भागात रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या देखील येत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार गुजरातमधील रिलायन्सच्या प्रकल्पातून अतिरीक्त ऑक्सिजन आयात करणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबतची माहिती दिली आहे.

या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यामध्ये शिंदे यांनी म्हटले आहे की, ‘रिलायन्सच्या जामनगर प्लँट मधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार. विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल.’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यातील ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे मदत मागणार असल्याचे सांगितले होते. मात्र, विरोधी पक्षाने ही मदत आधीच का मागितली नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता गुजरातमधील प्रकल्पातून राज्याला अतिरीक्त ऑक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना थोडाफार दिलासा मिळेल.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!