मुंबई : कोकणात पूर आला तेव्हा सर्व पालकमंत्री गायब झाले होते, त्याचीच पुनरावृत्ती मराठवाड्यात झाली आहे. निकम्मे पालकमंत्री, बेशरम सरकार अशी टीका महाविकास आघाडीवर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने सर्व पिके पाण्याखाली गेले आहेत. मात्र पालकमंत्री कुठेच पाहणी करताना दिसत नाहीत. तीन आठवड्यापूर्वी मराठवाड्यातील जवळपास पावने चारशे महसूल मंडळात अतिवृष्टी झाली, या नुकसानीचे तातडीने पंचनामे होणे अपेक्षीत असताना पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे अधिकारी सुस्त झाले आहेत. पालकमंत्र्यांनी तशा सुचनाच दिल्या नाहीत त्यामुळे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत. या बाबतचा साम टिव्हीने केलेले स्पॉट रिर्पोट अतुल भातखळकरांनी शेअर करत टिका केली आहे.
कोकणात पूर होता सर्व पालकमंत्री गायब होते, त्याचीच पुनरावृत्ती मराठवाड्यात झाली आहे. निक्कमे पालकमंत्री, बेशरम सरकार. pic.twitter.com/gq2SlqM6Cu
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 29, 2021
सध्या सोयाबीन काढणीस आलेले आहे, अनेक शेतकऱ्यांनी कापणी करुन शेतातच सोयाबीन ठेवले आहे, या सोयाबीनला सध्या अंकुर फुटल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे केलेला खर्च वाया गेला असून तोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावला आहे. तसेच कपासी, बाजरी, मका, ऊस आदी खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी होत असून प्रशासन ढिम्म झाले आहे, अशी टिका शेतकऱ्यांतून होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- सारंगी महाजन राजकारणात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?
- राजकीय नेत्यांच्या फटाके फोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी, म्हणाले..
- ‘गोव्यात शिवसेना विधानसभेच्या २२ जागा लढवणार’, संजय राऊतांची घोषणा
- ‘भाजपचा ईडी, सीबीआयद्वारे कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न’, राऊतांचा गंभीर आरोप
- ‘सध्या भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चा करू नका’, राज ठाकरेंच्या पक्षनेत्यांना सुचना


