Share

साऊथची श्रीवल्ली सोडून आता मराठीतील ‘या’ पुष्पावल्लीकडे सर्वांच्या नजरा…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हि मालिका 20 मार्च पासून रात्री 8 वाजता प्रसारित होणार असून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे  हि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून देखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा प्रेक्षकांना पुष्पावल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.

तू तेव्हा तशी या मालिकेबद्दल अभिज्ञा म्हणाली, “सो ऑफिशिअली मी तुम्हाला पुन्हा भेटायला येते आहे एका अशा भूमिकेत जी मला याआधी करायला मिळाली नाही.. मी आशा करते कि प्रेक्षकांकडून मला भरभरून प्रेम आणि पाठिंबा मिळेल, कारण माझी मेहनत 100 पटीने जास्त असणार आहे.”

आपल्या नवीन भूमिकेबद्दल बोलताना अभिज्ञा म्हणाली, “प्रेक्षकांनी मला आजवर अनेक नकारात्मक भूमिकांमध्ये पाहिलंय आणि माझ्या प्रत्येक भूमिकेवर भरभरून प्रेम केलं. पण तू तेव्हा तशी मधली भूमिका खूपच वेगळी आहे. मी या मालिकेत पुष्पवल्ली नावाची भूमिका निभावतेय. पुष्पवल्लीला पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल याची मला खात्री आहे.”

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!