🕒 1 min read
कोहापूर : काल (१७ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही, असे वक्तव्य केले होते. दरम्यान, शरद पवारांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच लोकशाहीत कुणालाही काहीही बोलायचा अधिकार आहे. पण गरजेल तो पडेल काय? असा सवालही पाटलांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,‘लोकशाहीत कुणालाही काहीही बोलायचा अधिकार आहे. परंतु गरजेल तो पडेल काय? आम्ही आमचे काम शांतपणे करतोय. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत ते दिसेल.’ तसेच राजकीय नेत्यांनी त्यांची बोलण्याची-वागण्याची संस्कृती बदलायला हवी, असेही पाटील म्हणाले.
दरम्यान, पवार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची सिल्वर ओकवर बैठक झाली. ही बैठक जवळपास दोन तास चालली. बैठक संपून आमदार निघण्याच्या तयारीत असताना शरद पवार उभे राहिले. ‘त्यांनी आपले दोन्ही हात वर करीत आणि वज्रमूठ तयार करून, घाबरायचे काही कारण नाही. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही,’ असा आत्मविश्वास यावेळी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या
- करुणा शर्मा उतरणार निवडणुकीच्या रिंगणात
- IPL 2022: हैद्राबादच्या संघात जोडला गेला ‘हा’ धडाकेबाज गोलंदाज; फलंदाजांना धोक्याची घंटा!
- रत्नागिरीत दोन पालख्या भेटीचा नयनरम्य सोहळा!
- IPL 2022: बायो बबलमध्ये खेळाडूंचे होळी सेलिब्रेशन, आवेश आणि व्यंकटेश अय्यर थिरकले
- “२०२४ ला धनंजय मुंडे विरुद्ध करुणा शर्मा ही निवडणूक शंभर टक्के होणार”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
