मुंबई : गेल्या काही आठवड्यापासून राज्य आणि देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोरोनाच्या याविळख्यात बॉलीवूडसह क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांना आपल्या जाळ्यात ओढले. यातील अनेक कलाकारांनी बरे होताच कामाला सुरुवातही केली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन जाहीर केल्यामुळे शुंटीग थांबल्याने अनेक सेलीब्रिटी मुंबईच्या बाहेर गेले आहेत.
काही दिवसापुर्वी रणवीर आणि दिपीका हे दोझे बंगळुरुला गेले असल्याची माहिती समोर आली होती. आता कोरोनातुन सावरल्यानंतर रणबीर आणि अलियाने लॉकडाउनची सुट्टी घालवण्यासाठी मालदीवला गेले आहेत. रणबीर-आलीया दोघांचे एअरपोर्टवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत दोघेंही विमानतळावर कारमधून उतरताना दिसत आहे. दोघंही मालदीवसाठी रवाना झाले आहेत अशी सूत्रानी माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/p/CN1UvBInBIC/
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसांचे लॉकडाउन जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. मागच्या महिन्याभरात बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार, मनोज वाजपेयी, आमिर ख़ान, रणबीर कपूर, आलिया भट्ट, आर माधवन, तारा सुतारिया, कार्तिक आर्यनसह अनेक बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण झाली होती.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना अलर्ट! उस्मानाबादेत मृत्यूदर सर्वाधिक, पॉझिटिव्हिटी रेट ही वाढला
- ऑक्सिजन टँकर चालवण्यासाठी सरकारला ड्रायव्हर मिळेना,आता एसटी ड्रायव्हर चालवणार टँकर
- नागरिकांनो घरीच रहा अन्यथा….
- नांदेड येथील २०० खाटांचे जंबो कोविड सेंटर आजपासून रुग्णांसाठी कार्यरत
- हैद्राबादच्या सलग तीन पराभवानंतर मेंटॉर व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी घेतली खेळाडूंची शाळा


