Share

कोरोना अलर्ट! उस्मानाबादेत मृत्यूदर सर्वाधिक, पॉझिटिव्हिटी रेट ही वाढला

Published On: 

उस्मानाबाद: राज्यात कोरोना महामारीची आलेली लाट ही भयंकर असणार असे म्हंटल्या जात होते, पण ही लाट अपेक्षेपेक्षा ही जास्त भयंकर निघाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढला आहे. १० ते १६ एप्रिल या सात दिवसांचा रुग्ण सापडण्याचा पॉझिटिव्हिटी रेट जाहीर झाला असून राज्यात उस्मानाबादचा रेट सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात ११ हजार २४६ रुग्णाचे नमुने तपासण्यात आले त्यापैकी ४ हजार ४७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून हा दर ३९.८२ टक्के आहे.

या स्थिती असतानाही रेमडीसीवीर इंजेक्शन उपलब्ध नाही तर कोरोनाची कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन्ही लस संपल्याने लसीकरण मोहीम बंद करण्यात आली आहे तर ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड फुल्ल असून रुग्णांना बेड मिळणे मुश्किल झाले आहे. दररोज जवळपास २० रुग्णाचा मृत्यू होत असून ही बाब चिंताजनक मानली जात आहे. उस्मानाबाद पाठोपाठ हिंगोली जिल्ह्याचा नंबर असून तो ३९. २९ टक्के आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८६ हजार ६९८ नमुने तपासले त्यापैकी २९ हजार ०७७ रुग्ण सापडले त्यामुळे रुग्ण सापडण्याचा दर २२. १५ टक्के आहे. जिल्ह्यात २२ हजार ६०७ रुग्ण बरे झाले असून ७९.१२ टक्के रुग्ण बरे होण्याचा दर आहे तर ७११ रुग्णांचा मृत्यू झाला असून २.३७ टक्के मृत्यू दर आहे. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. जिल्ह्यात शुक्रवारच्या आकडेवारीनुसार २९ हजार ०७७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!