🕒 1 min read
नांदेड : येथील २०० खाटांचे नव्याने सुरु झालेले जम्बो कोविड सेंटर सोमवारपासून रुग्णांसाठी कार्यरत झाले आहे. येथे रुग्णांसाठी ऑक्सिनची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला औषधोपचासाठी तसेच निट हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना येते कार्यरत करण्यात आल्या आहेत.
नांदेड शहरासह जिल्हाभरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच उशीरा कोरोना झाल्याचे लक्षात आल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढल्याने अश्या चिंताजनक असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा लागत असल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. या वर उपाययोजना करण्याचे काम नांदेड शहरासह जिल्हाभरामध्ये सुद्धपातळीवर करण्याचे काम सुरु आहे.
नांदेड शहसासह ग्रामीण भागातील नागरिकांना प्रारंभिक उपचार किंवा ऑक्सिजनसाठी नांदेडच्या रुग्णालयात येण्याची गरज लागू नये म्हणून या दृष्टीने अनेक ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. मध्यंतरी जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे ऑक्सिजन कमी पडेल असे वाटत होते. पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. नांदेड जिल्ह्यातील ऑक्सिजनची साठवण क्षमता वाढवण्याचे काम युद्ध पातळीवर करणे सुरु आहे. १३ तालुक्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु करत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- सामना गमावला मात्र, राहुल-मंयकच्या जोडीने तोडला ५ वर्षे जुना विक्रम
- गर्दी कमी झाली नाही तर, कडक लॉकडाऊन करणार : पालकमंत्री अशोक चव्हाण
- नगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती करा, मुख्यमंत्री ठाकरेंना निवेदन
- वॉर्नर, विल्यमसननं राशिद खानसोबत केला रमजानचा रोजा
- खा.भावना गवळी यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा


