Share

ऑक्सिजन टँकर चालवण्यासाठी सरकारला ड्रायव्हर मिळेना,आता एसटी ड्रायव्हर चालवणार टँकर

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरच मिळत नसल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अशी माहिती दिली आहे. ‘राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचं कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स आम्ही ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत,’ असे अनिल परब यांनी यावेळी सांगितलं आहे.

राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे. आज म्हणजेच १९ एप्रिलला कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने ही ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार आहे. दहा टँकर महाराष्ट्रातून जाणार आहेत. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर नेण्यासाठी रेल्वेची पूर्ण तयारी झाली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रवाना होणार आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!