Share

नागरिकांनो घरीच रहा अन्यथा….

Published On: 

🕒 1 min read

लातूर: राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे त्याच सोबत मृत्यू दर देखील वाढत आहे, त्यामुळे राज्यात परिस्थिती चिंताजनक झाली असल्याने सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना करत आहे. कडक निर्बंध लावले असले तरी देखील अनेक बेशिस्त नागरिक घराबाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे. यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त जळकोट येथे बघायला मिळत आहे.

पोलिसांनी चौका-चौकात नाकाबंदी केली आहे तसेच ज्यांनी तोंडाला मास्क लावला नसेल त्यांची गय केली जाणार नसल्याचे या वेळी पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी सांगितले आहे. नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.

नाकाबंदीत नागरिकांसह वाहनांची तपासणी करण्यात आली. नाकाबंदी पॉईंटवर एक पोलीस अधिकारी, चार कर्मचारी व चार विशेष पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. नाकाबंदी दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. याप्रसंगी शहरामध्ये २७ बेशिस्त तोंडावर विना मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून २ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!