Share

अलर्ट! जालना जिल्ह्यात ५२१ नवे बाधित, दोन जणांचा मृत्यू

Published On: 

जालना: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून सोमवारी ५२१ नव्या बाधितांची भर पडली, तर उपचारादरम्यान दोघांना आपला जीव गमवावा लागला. तसेच दिवसभरात बरे झालेल्या ४५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जालना तालुक्यातील एकूण २२०, मंठा ९, परतूर ५३ घनसावंगी ३६, अंबड ५४, बदनापूर ३१, जाफराबाद ७, भोकरदन ७० तसेच इतर जिल्ह्यांतील ४१ अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे ५०२ तर अँटिजन तपासणीद्वारे १९ असे एकूण ५२१ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली.

आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ५३ हजार ४१४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ३८ हजार ३२५ अहवाल पॉझिटिव्ह तर २ लाख १३ हजार ३०७ निगेटिव्ह आले. तसेच प्रयोगशाळेत १४५० अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, ३० हजार १७८ जणांनी आतापर्यंत कोरोनावर यशस्वी औषधोपचाराने मात केली असून दुर्दैवाने ६२० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार ५२७ एक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

संस्थात्मक अलगीकरणात ७०३ जणांना पाठवले: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोमवारी राज्य राखीव पोलिस बल क्वार्टर ए ब्लॉक ७०, बी ब्लॉक १५, सी ब्लॉक ६२, डी ब्लॉक ४१, ई ब्लॉक ५७, केजीबीव्ही परतूर १९, केजीबीव्ही मंठा ३९, शासकीय तंत्रनिकेतन अंबड १३८, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर २०, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी ७३, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी ८३, केजीबीव्ही घनसावंगी ५९, शासकीय मुलांचे वसतिगृह एमआयडीसी इमारत क्र.१ भोकरदन १२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत क्र. २ भोकरदन १२, आयटीआय कॉलेज जाफराबाद ३ अशा ७०३ जणांनी संस्थात्मक अलगीकरणात पाठवले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!