Share

‘मदिरा‘ चालू, ‘मंदिरं‘ बंद! तुघलकी राज्य सरकारचा जाहीर निषेध, निलंगेकरांचा हल्लाबोल

Published On: 

🕒 1 min read

लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. यावरुन भाजप राज्य सरकारवर टीका करतेय. त्यात भाजपच्या वतीने राज्यभर ‘शंखनाद आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. या मध्ये आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनीही राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

संभाजी पाटील यांनी राज्य सरकारवर टीका करताना सरकारच्या धोरणाचाही निषेध केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे सरकाचा निषेध करत टीका केली. ते म्हणाले की, ‘मदिरा‘ चालू, ‘मंदिरं‘ बंद! तुघलकी राज्य सरकारचा जाहीर निषेध.’

राज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी, यासाठी राज्यभर भाजपने आंदोलन केले आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर पलटवार केला आहे. केंद्रातील भाजप सरकारनेच मंदिरे बंद ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत. तर भाजपची सत्ता असलेल्या राज्यातील मंदिरे उघडी आहे का? असा प्रश्नही सत्ताधारी उपस्थित करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!