दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. परंतु सध्यस्थिती पाहता राज्यातील ही कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. पण अनेक तज्ञ मंडळींकडून आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात होती. कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त दिसून आलं आहे. शिवाय कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे आणि ही लाट लहान मुलांसाठी जास्त धोकादायक ठरू शकते, असं सांगितलं जात आहे. यासाठी जिल्हास्तरावर बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्सची स्तप्ना करण्यात आली आहे.
टास्क फोर्सने केलेल्या अभ्यासानुसार सुमारे १ लाख १५ हजार बालकांना तिसर्या लाटेत कोरोनाचा धोका संभवतो. यातल्या ९५ टक्के बालकांना होम आयसोलेशनमध्येच उपचार करता येऊ शकतात. केवळ ५ हजार बालकांना रूग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. यादृष्टीनं प्रशासनाने पूर्वतयारी केली असून जिल्हयात सुमारे एक हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आलीये. तसंच, लहान मुलांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी पालकांमध्येही जनजागृती करण्याबाबतचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान केंद्र सरकारनेही लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग होण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे आणि नागरिकांना सावध केलं आहे. जर कोरोनाव्हायरसमध्ये काही बदल झाले, तर मुलांसाठी धोका वाढू शकतो, अशी धोक्याची सूचना नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात आज १४९१० रुग्ण कोरोनामुक्त, तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘बाळासाहेब असते तर विमानतळाला नाव नाकारले असते!’, भुजबळांचा शिवसेनेला सल्ला
- ‘मी लठ्ठ असले तरीही…’, आपल्या लठ्ठपणावर बोलली विद्या बालन
- श्रीलंका दौऱ्यावर जाण्याआधी खेळाडूंना राहावं लागणार ‘इतके’ दिवस ‘क्वारंटाइन’
- आरक्षणावर नक्षल्यांची भूमिका जाहीर, ‘मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा!’


