🕒 1 min read
चेन्नई : श्रीलंकेविरुद्धची सीरिज 2-0 अशी जिंकत इंग्लंडची टीम भारतामध्ये दाखल झाली आहे. या विजयात अनुभवी जेम्स अँडरसननचा मोठा वाटा होता. अँडरसन चेन्नईमध्ये होणाऱ्या दोन टेस्टपैकी किमान एक टेस्ट खेळणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडकडं स्टुअर्ट ब्रॉड हा आणखी एक अनुभवी फास्ट बॉलर आहे. जोफ्रा आर्चर आणि स्विंग बॉलिंग करु शकणाऱ्या बेन स्टोक्सच्या समावेशानं इंग्लंडची टीम मजबूत मानली जात आहे.
अशातच इंग्लंड संघासाठी आनंदाची व भारतीय संघासाठी काहीशी आव्हानात्मक बातमी समोर येत आहे. इंग्लंड संघाचा स्टार खेळाडू जॉनी बेयरस्टो भारताविरुद्ध शेवटच्या 3 सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे. बेयरस्टोला पहिल्या 2 सामन्यांसाठी आराम देण्यात आलेला होता. मात्र आता इंग्लंड संघाने स्पष्ट केले आहे की बेयरस्टो शेवटच्या 3 सामन्यात खेळणार आहे. बेयरस्टोला आराम देण्याच्या निर्णयावरून अनेक माजी दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी इंग्लंड संघ व्यवस्थापनावर टीका केली होती.
इंग्लंड संघ भारताच्या दौऱ्यावर 4 कसोटी, 5 टी 20 व 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 5 फेब्रुवारी पासून चेन्नई येथे होणाऱ्या कसोटी सामन्याने होणार आहे. दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने ही मालिका उत्कंठावर्धक होण्याची सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असणार आहे. भारतासाठी या मालिकेत नियमित कर्णधार विराट कोहलीसह अनेक महत्त्वाचे खेळाडू पुनरागमन करणार आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही कसोटी मालिका महत्त्वाची असणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ नागरी सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी ३ परदेशींसह हुबळीतील तरुणीला अटक !
- “ऑलिम्पिक संयोजनाबाबत संयम बाळगा”
- ‘शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?’
- मंदिर सुरू झाल्यानंतर अवघ्या ७१ दिवसांत साईबाबांच्या झोळीत ‘इतक्या’ कोटींचे दान
- २८ फेब्रुवारीपर्यत कर भरा अन् १०० टक्के सूट मिळवा; ‘या’ महापालिकेने दिली खास ऑफर !


