🕒 1 min read
चंदीगड : पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अंतर्गत गटबाजीला कॉंग्रेसमध्ये उधान आले असताना ही गटबाजी संपवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या काँग्रेसला टक्कर देण्यासाठी विरोधी बाकांवरील शिरोमणी अकाली दलाने तयारी सुरू केली आहे.
येत्या 2022मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आहे.तब्बल 25 वर्षानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष मिळून कॉंग्रेस तसेच भाजपसमोर तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या आघाडीची घोषणा केली आहे.
पंजाबमध्ये दलितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. पंजाबमध्ये लोकसंख्येच्या 33 टक्के दलित आहेत. त्यामुळे दलित मते आपल्याकडे खेचण्यासाठी बसपा आणि अकाली दलाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय भाजपशी युती तोडल्यानंतर पंजाबमध्ये स्वबळावर लढणं जोखमीचं ठरणार होतं. त्यामुळेही अकाली दलाने बसपाची साथ घेतल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, अकाली दल आम आदमी पार्टी सोबत आघाडी करेल अशी देखील शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र बसपा सोबत जाण्याचा अकाली दलाने निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘आप’ने गेल्या काही वर्षात आपली ताकत या राज्यात चांगलीच वाढवली असल्याने ही चर्चा सुरु होती.
बसपा सोबतच्या आघाडीची घोषणा करतानाच अकाली दलाने जागावाटपाचा फॉर्म्युला देखील जाहीर करण्यात केला आहे. ११७ जागांसाठी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बसपा २० जागा लढवणार आहे, तर अकाली दल ९७ जागा लढवणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘धनंजय मुंडे हे माझे पती आहेत आणि मी माझ्या पतीच्या पैशातूनच समाजसेवा करत असते’
- श्रीलंका दौऱ्यासाठी निवड न झाल्याने निराश खेळाडूची भावनिक पोस्ट
- ‘सीएसकेचा सदस्य होणे ही सकारात्मक बाब’, श्रीलंका दौऱ्यावर निवड झालेल्या ‘या’ खेळाडुने मांडले मत
- प्रशांत किशोर-शरद पवार यांची भेट भाजपसोबत शिवसेना आणि कॉंग्रेससाठी देखील धोक्याची घंटा ?
- मी नेमकी कितवी पत्नी आहे हे सत्य लोकांसमोर येवू नये म्हणून माझ्यावर बंधने आणली गेली – करुणा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
