🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना ७ मे रोजी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला होता. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरताना ३३ टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे निर्बंध उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्त पदे आता २५ मे २००४ च्या सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले होते.
परंतु पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बराच वाद झाला होता. यामुळेच आता पद्दोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. पदोन्नती आरक्षण रद्द केल्याने ठाकरे सरकारवर बहुजन समाजातून टीका केली जात होती. यानंतर, आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या जनसंपर्क खात्याकडून संबंधित जीआरला स्थगिती देण्यात आल्याचे भाष्य करण्यात आले आहे.
याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नितीन राऊत यांच्यात खटका उडाला आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदोन्नतीमध्ये आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीवर चर्चा झाली. या बैठकीत पदोन्नतील आरक्षण जीआरला तूर्तास स्थगिती दिली जावे, अंमलबजावणी करू नये अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. मात्र, बैठकीत असं काहीच ठरले नसताना नितीन राऊत यांनी भूमिका मांडल्याने अजित पवार हे नाराज झाल्याचे समजते.
पदोन्नती मधील आरक्षण रद्द करण्याच्या जीआरला स्थगिती दिल्याचे नितीन राऊत यांच्या विभागाने प्रसिद्धी पत्रामार्फत सांगितले. मात्र, पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भातल्या जीआरला स्थगिती देण्याचा कोणताही निर्णय तूर्तास झाला नाही, अशी माहिती सध्या समजत आहे. अजित पवार आणि जितीन राऊत यांचे याबाबत मतांतर झाले आहे. यावरून हे दोन्ही नेते आमने-सामने ठाकले असून कॅबिनेट बैठकीतही आज यावर चर्चा न करता अजित पवार यांनी नाराजी अप्रत्यक्ष व्यक्त केल्याचे वृत्त एका वाहिनीने दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- गंभीर! करुणा मुंडेंचे राज्यपालांना पत्र, धनंजय मुंडेंकडून जिवाला धोका असल्याची तक्रार
- ‘हक्क मागतोय, भीक नाही ! सरकारच्या मानेवर बसून आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज व्हा…’
- ‘मी मराठी शिकावं यासाठी माझे पती धनंजय मुंडे माझ्याकडे नेहमी आग्रह धरायचे’
- संतापजनक : दोन वर्षाच्या कोरोनाग्रस्त चिमुकल्याचा मृतदेह सोडून जन्मदाते आई-वडील पसार
- …म्हणून मुंबई महापालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करणार ; भाजप आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
