Share

गंभीर! करुणा मुंडेंचे राज्यपालांना पत्र, धनंजय मुंडेंकडून जिवाला धोका असल्याची तक्रार

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनंजय मुंडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना आपलं खासगी आयुष्य उलगडून सांगण्याची वेळ धनंजय मुंडेंवर आली होती. त्यावरुन उडालेला धुरळा शांत होतो, न होतो, तोच पुन्हा एकदा या नात्यासंबंधी चर्चेला उधाण आले आहे.

करुणा मुंडे यांनी राज्यपालांना देखील तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आणि धनंजय मुंडेकडून जिवाला धोका असल्याबाबत पत्र लिहिले आहे. यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

‘गेली २५ वर्षे आपण घराबाहेर पडलो नाही. पण गेल्या दोन महिन्यांपासून घराबाहेर पडून बोलायला सुरुवात केली आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घडामोडींविषयी केस असल्यानं कोर्टानं मला बोलण्यास मनाई केली आहे. मात्र, जेव्हा वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी पुराव्यासह मांडेन, असा इशारा करुणा यांनी याआधीच दिला होता.

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून बलात्काराचा आरोप फेटाळून लावला होता. रेणू शर्मा आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, हा आरोप फेटाळताना त्यांनी एका महिलेसोबत (रेणूची बहीण करुणासोबत) संबंध असल्याचं मान्य केलं होतं. आमचे परस्पर सहमतीने संबंध होते आणि त्यातून आम्हाला दोन अपत्य झाली आहेत. या मुलांना मी माझेच नाव दिले आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. परंतु, करुणा यांच्याशी विवाह झाल्याचं त्यांनी कबूल केलेलं नाही.

धनंजय मुंडे यांनी सार्वजनिकरित्या त्यांच्या नात्याचा स्विकार केला. त्यावेळी दूसऱ्या पत्नीला असलेल्या दोन मुलांना देखील मुंडे यांनी स्वतःचे नाव लावले आहे. त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर ते धनंजय मुंडे यांची मुले आहेत असे नमूद असल्याचाही खुलासा मुंडे यांनी त्यावेळी केला होता.

मुख्यमंत्र्यांना साकडे

आपले पती धनंजय मुंडे यांचे मुंबई, पुणे, परळी (बीड) येथे बंगले आणि घरे असताना  मुंबईतील मनोरा या आमदार निवासाच्या बांधकामासाठी ९०० कोटींचा खर्च करण्याची आवश्यकता काय, असा सवाल करुणा मुंडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. फेसबुक लाइव्हमध्ये करुणा मुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित करताना मनोराच्या नूतनीकरणासाठी लागणारे पैसे हे गोरगरीबांसाठी वापरावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!