🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच दिलेली एक मुलाखत चर्चेत आहे. मराठी अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत विखे पाटील यांनी केलेल्या एका विधानाची फारच चर्चा होत आहे. या वक्तव्याची भाजपपासून सर्व पक्षांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांबद्दल विखे पाटील यांनी वक्तव्य केले आहे.
“अजितदादा परत आमच्यासोबत या, असं विधान विखे पाटलांनी केले आहे. या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजितदादांचं कौतुक केलंय. यानंतर त्यांनी अजित पवारांना पुन्हा सोबत येण्याच सल्लाही दिलाय. पुष्कर श्रोत्री यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केलंय.
दरम्यान भाजप नेते आणि विधानपरिषेदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी केलेलं हे विधान त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
