पुणे : राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. याच मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी राज्यातील महत्वाच्या नेत्यांसोबत भेटीगाठी घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संभाजी छत्रपती यांनी अत्यंत संतप्त भावना व्यक्त केल्या.
‘कोरोनाच्या काळात जीव महत्वाचा आहे. मात्र, मराठा समाजाला गृहीत धरलं जात असून आता हद्द पार झाली असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला ६ जून पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांनी समाजाच्या प्रमुख ५ मागण्या केल्या असून त्या मान्य न झाल्यास ६ जून पासून मोठं आंदोलन छेडलं जाईल असं संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं आहे.
संभाजीराजे म्हणाले की, ‘आम्हाला कुणाच्या भांडणाशी देणंघेणं नाही, आमच्या मराठा समाजाला न्याय द्या. कोणत्या पक्षाच्या वतीने किंवा राजकीय भूमिका घेऊन बोलत नाही. मला कोणत्याही पक्षावर टीका करायची नाही, असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे. आरक्षणाच्या प्रश्नामुळं मराठा समाज अस्वस्थ आहे. मी असल्यामुळं मराठा समाज शांत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संभाजीराजे यांनी सरकारला हा इशारा दिल्यानंतर आता सत्ताधारी नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले,संभाजी राजे यांनी ६ जून पर्यंतची मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे.पण या तारखेला अद्यापही ९ दिवस अवकाश आहे. यादरम्यान नक्कीच चांगला निर्णय घेता येईल असे ते म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा विळखा होतोय घट्ट, आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान!
- दिलासा…औरंगाबादेत पॉझिटिव्हीटी रेट २.२७ टक्क्यांपर्यंत खाली, तर रिकव्हरी रेट ९६.४० टक्क्यांवर!
- पुण्यातील लॉकडाऊनमध्ये मोठा बदल, राजेश टोपेंनी केली घोषणा
- अखेर स्मार्ट सिटी बसला मिळाला मोबदला, १ कोटी ७० लाख आले, ८ लाख बाकी!


