मुंबई : राज्यात पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालं आहे. त्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जर केंद्र सरकारने 50 हजार रुपये राज्य आपत्ती निधीतून द्यायला सांगितले असेल तर ते देता येईल, कारण केंद्राकडूनच हा निधी दिला जातो. केंद्र सरकारनं दुजाभाव करु नये. कारण आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे. असं अजित पवार म्हणाले.
वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी केली जातेय. पण महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. प्रत्येक पालकमंत्री त्या त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अडचणीतील माणसाला मदत करायचं काम सुरु आहे. तलावातला गाळ जिथं कँचमेंट एरिया आहे तिथं टाकला जाऊ नये. आता संकट आहे त्यामुळं त्यावर चर्चा करता नंतर करता येईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय’ नवाब मलिकांचा आरोप
- साडीमुळे प्रवेश नाकारलेले रेस्टॉरंट बंद; महापालिकेची कारवाई
- ‘आ.रवी राणांविरोधातील तक्रारीचे काय झाले?’, हायकोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- आपल्या पक्षाला राष्ट्रीय अध्यक्षच नाही, त्यामुळे निर्णय कोण घेतंय याची कल्पना नाही – सिब्बल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

