Share

साडीमुळे प्रवेश नाकारलेले रेस्टॉरंट बंद; महापालिकेची कारवाई

Published On: 

नवी दिल्ली : दिल्लीतील Aquila नावाच्या रेस्टॉरंटमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडीओद्वारे असे समोर आले होते की, यातील एका महिलेने साडी नेसल्यामुळे तिला रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला होता. भारतीय संस्कृतीत पारंपारीक साडीला खूप महत्व आहे. मात्र साडी नेसल्यामुळे प्रवेश नाकारल्याने याबाबत सध्या सोशल मिडीयावर संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर आता या रेस्टॉरंटवर कारवाई करुन हॉटेल बंद करण्यात आलं आहे.

या रेस्टॉरंटवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. हे हॉटेल विना परवाना असल्याने प्रशानसाकडून नोटिस जारी करण्यात आली आहे. दक्षिण दिल्ली महानगरपालिकेचे महापौर मुकेश सूर्यन यांनी कारवाईबाबतची माहिती दिली.21 सप्टेंबर रोजी परिसरातील सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांना आढळलं, की रेस्टॉरंट परवान्याशिवाय, अस्वच्छ स्थितीत चालत होते आणि या रेस्टॉरंटने सार्वजनिक जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केला असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. यामुळे रेस्टॉरंटवर कारवाई केली आहे.

दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये साडी परिधान केल्यामुळं महिलेल्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकरण्यात आला. त्यावरुन महिला आणि रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांमध्ये वादही होत असल्याचं दिसत आहे. शेफाली यांनी व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं की,  हे कोणी ठरवलं की, साडी ‘स्मार्ट वेअर’ नाही? मी यूएस, यूएई सोबतच यूकेमधील सर्वात उत्तम रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेले होते. तिथे मला कोणीच थांबवलं नाही आणि हे रेस्टॉरंट भारतात एक ड्रेस कोड ठरवतंय आणि स्वतःच ठरवतंय की, साडी ‘स्मार्ट वेअर’ नाही? हे विचित्र आहे, असे त्या महिलेला सांगण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!