Share

‘राज्यपाल भवन आता राजकीय अड्डा झालाय’ नवाब मलिकांचा आरोप

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपच्या नेत्यांना भाजप कार्यकर्ते भेटतात ही काही बातमी नाही. कारण राज्यपालभवन हे आता राजकीय अड्डा झाला आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

भाजप नेते राज्यपालांची भेट घेणार अशा बातम्या येत आहेत. दरम्यान त्यावरूनच नवाब मलिक यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे नेते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. तसेच भाजपचे नेते व कार्यकर्ते राज्यपालांना नेहमीच भेटतात. त्यामुळे राज्यपाल पदाचा वापर राजकीय हेतूने होतो हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यपाल भवन राजकीय अड्डा झालाय यात कुणाचं दुमत नाही, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

राज्यपाल हे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या आधी राज्यपालांनी कोविड संदर्भात आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यावेळी केंद्राकडे तक्रार करण्यात आली होती. राज्यपाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना आपण आजही मुख्यमंत्री आहोत असं वाटतं. त्यांना ते मुख्यमंत्री नाहीत हे समजावून सांगितलं जाईल, असा खोचक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!