🕒 1 min read
पुणे : राज्यातील सत्तासंघर्षानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर विधानसभेच्या विशेष बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते कि, रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांसोबत गाठीभेटी व्हायच्या. कुणी उठायच्या आत आम्ही आपापल्या घरी असायचो. यानंतर शिंदेंच्या या विधानाला अमृता फडणवीस यांनी दुजोरा दिला आहे. देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातला की ते मलाही ओळखू यायचे नाही, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं होत. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले कि, ‘माझा नवरा वेश बदलून बाहेर जायचा, असे एका नेत्याच्या धर्मपत्नीने सांगितले आणि तेच नेते म्हणत होते की, यात आमचा काहीही संबंध नाही आहे,’ असा टोला अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीच्या योजनांच्या स्थगितीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगतिलं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने अनेकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. मात्र मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाहीत. उलट मला याबाबत मला गर्व वाटत होता. त्यांनी त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे. कारण देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
