मुंबई : मराठा सेवासंघ ३२व्या वर्षात पदार्पण करत असताना आता संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वक्तव्याने एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं असं म्हणतानाच भाजपशी युती हाच पर्याय असल्याचं म्हटले आहे. मराठा मार्ग या मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकात ही भुमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे सत्तेसाठी ब्रिगेड आपला पारंपरिक विरोध गुंडाळून ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान यावर आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ते आज पुणे येथे आढावा बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘काही संघटना राजकारणविरहित विशिष्ट उद्देशाने काम करीत असतात. तर अनेकांना वाटते की आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणाशी तरी युती करावी. त्यांना काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील. मी त्याच्यामध्ये बोलणे योग्य नाही असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे.
दरम्यान संभाजी ब्रिगेड म्हणजे राष्ट्रवादीचं पिल्लू आहे अशा प्रकारे अनेक वर्षे संभाजी ब्रिगेडची हेटाळणी देखील झाली आहे. पण आता वेळ आलीय ती काहीतरी भूमिका घ्यायची. त्यानुसार संभाजी ब्रिगेडने भाजपशी युती करण्याचा विचार करावा, असे स्पष्ट मत खेडेकर मांडले आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे किती बदलतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नव्या भारताचे ‘राष्ट्रपिता’; अमृता फडणवीस यांनी दिल्या मोदींना खास शुभेच्छा
- ‘पुढचे तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहणार असतील तर भाजपसोबत जाण्यास तयार’
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- राज्यपालांनी महिलेचा मास्क काढल्याने वाद; अजितदादा म्हणाले, ‘राज्यपाल महामहिम, त्यांच्याबाबत…’
- मित्रांसाठी नाही तर जनतेसाठी काम केलं असतं तर…; गांधींनी सांगितलं बेरोजगारी दिवसाचं कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

