कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. तीन महिन्यात वीस हजार अनधिकृत बांधकामे पाडण्याचा लक्ष महापालिकेने ठेवले आहे. प्रामुख्याने आरक्षित भूखंड, रस्त्यामध्ये बाधित असलेली बांधकामे किंवा नव्याने होत असलेली बांधकामे यांच्यावर कारवाईला सर्वात आधी प्राधान्य दिले जाणार असल्याचे केडीएमसीने सांगितले आहे.
मात्र कल्याण डोंबिवली मध्ये असं होताना दिसून येत नसून डोबिवली पलावा जंक्शन परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली असून त्यामध्ये दारूची दुकाने ही आहेत. या मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
विशेष म्हणजे तिथे पुलाचे काम सुरु आहे, या अनधिकृत बांधकामा मुळे विकास कामाला अथळा होत असून या ठिकाणी एखादी दुर्घटना घडू शकते. या बाबत स्थानिक मनसे आमदार राजू पाटील यांनी वारंवार तक्रारी देऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका कारवाई करत नसल्याने फक्त नोटिसा पाठवून इलेक्शन फंड जमा करत असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांही केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय अबाधित राहील’ – हरिभाऊ राठोड
-
‘त्या’ प्रकरणी मोदी सरकारविरोधात विधानसभेत निंदा प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंचा इशारा
-
“प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”; आर्यन खान प्रकरणावर संजय राऊत आक्रमक!
-
मोठी बातमी! आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही; चौकशीत उघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
