🕒 1 min read
मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. तूर्तास लॉकडाऊन नको, पण निर्बंध कडक करण्याचा विचार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रालयातील महत्वाच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात तासभर बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिवही उपस्थित होते. यावेळी राज्यात कोणताही लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कंटेन्मेट झोन वाढवणे, लसीकरण वेगाने करणे, रुग्णालयांची सज्जता आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात मंगळवारी १८ हजार ४६६ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४ हजार ५५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज २० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ६६ हजार ३०८ वर पोहोचली आहे. कोरोनाच्या सुरुवातीपासूनची आकडेवारी पाहिली तर राज्यात आतापर्यंत ६७ लाख ३० हजार ४९४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६५ लाख १८ हजार ९१६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या १ लाख ४१ हजार ५७३ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘खुर्चीवर कोण बसलं होतं, याचा शोध लावला पाहिजे’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
- आम्हाला मरणाची परवानगी द्या; औरंगाबादेतील एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!
- “धनंजय मुंडेंचा आपल्याच सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ, हे सरकार नाही तमाशाचा फड”
- सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांना चांगलं आयुष्य लाभलं- पंतप्रधान मोदी
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
