मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर विरोधक चांगलाच निशाणा साधत आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते त्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांच्यावर वायक्तिक पातळीवर जाऊन टीका केली आहे. आता आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील २२७ शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक आमदार, खासदार यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. या बैठकीवर देखील भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शाखाप्रमुख, विभागप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासोबत बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांच्या टीकेवर भाष्य केले आहे, ‘मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलो आहे. माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी शांतपणे घेत आहे. ज्याला दाखवायचं आहे त्याला मी त्याच वेळी करुन दाखवतो. मी माझ्या कामानेच माझी पोचपावती देतो. तुम्ही निवडणुकीसाठी तयारीला लागा,’ असे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना उद्देशून म्हणाले आहेत.
या बैठकीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी टीका करत म्हणलं, मुख्यमंत्र्यांनी बैठक कुठे घेतली, बैठकीला कोण कोण होते, आणि खुर्चीवर कोण बसलं होतं, याचा शोध लावला पाहिजे, असा खोचक टोला भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

