Share

सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांना चांगलं आयुष्य लाभलं- पंतप्रधान मोदी

Published On: 

नवी दिल्ली: ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkaal) यांचे काल (४ जानेवारी) रात्री ८ वाजून १० मिनिटांनी वयाच्या ७४ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रूग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे त्यांचे काल निधन झाले. सिंधुताई यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही ट्वीट करत श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली. सिंधुताईंच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलांना चांगलं आयुष्य लाभलं, सिंधुताई त्यांच्या कार्यासाठी लक्षात राहतील असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आदरांजली वाहिली आहे.सोबतच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यांयारी यांनीही सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त समजून अतिशय दुःख झाले. स्वतःच्या जीवनात अतिशय विपरीत परिस्थिती येऊन देखील सिंधुताईंनी स्वतःला सावरले व पुढे त्या हजारो अनाथ मुला – मुलींच्या आई होऊन त्यांचे जीवन सावरले. अशा शब्दांत आदरांजली वाहिली आहे.

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. नको असताना मुलगी झाली म्हणून त्यांचे नाव चिंधी ठेवले होते. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.१९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. या ठीकाणी लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. अशा लाखो जीवांच्या कैवारी सिंधुताई यांना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान आज पुण्यात ठोसर पागा येथे  सिंधुताई यांचा दफनविधी करण्यात येईल. महानुभाव पंथाच्या अनुयायी असल्याने दफनविधी करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!