महाराष्ट्र देशा डेस्क : जेव्हा मैत्री हा शब्द कानावर पडतो तेव्हा आपल्याला अनेक जोड्या आठवतात. जसे कि मोठ्या पडद्यावरील जय-वीरू किंवा खऱ्या आयुष्यातील आमिर खान-सलमान खान. अशाच काही मित्रांच्या जोड्या आपल्याला राजकारणातही पाहायला मिळतात. असं सांगितलं जातं कि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे दिवसा होणाऱ्या सभांमध्ये एकमेकांवर राजकीय दृष्टिकोनातून तूफान टीका करायचे आणि रात्री मैत्रीच्या नात्याने एकत्र स्नेहभोजन करायचे. अशीच एक जोडी आताही उदयाला येत आहे, ती आहे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. झालंय असं कि, उपमुख्यमंत्र्याला दिला जाणारा ‘देवगिरी’ बंगला पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला देण्यात आला आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना ज्या बंगल्यात राहत होते तिथेच ते आताही राहणार आहेत. मलबार हिल येथील देवगिरी बंगला हा सहसा उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ मंत्र्याला दिला जातो. ठाकरे सरकार सत्तेत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे याच बंगल्यात राहत होते.
देवगिरी बंगल्याच्या वाटपाबाबत अध्यादेश जारी-
दरम्यान सत्ता बदल झाल्यानंतर हा बांगला सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळणार होता. मात्र हा बंगला पुन्हा आपल्यालाच मिळावा, अशी मागणी अजित पवारांनी केली होती. तर मंगळवारी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने देवगिरी बंगल्याच्या वाटपाबाबत अध्यादेश जारी करत सांगितले कि हा बंगला पवारांकडेच राहणार आहे. त्यामुळे कदाचित पहिल्यांदाच हा बंगला विरोधी पक्षनेत्याला देण्यात आला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवारांचे चांगले संबंध –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अजित पवारांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे देवगिरी बंगला विरोधी पक्षनेत्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पातळीवर घेण्यात आला आहे. मात्र हा निर्णय इथून पुढेही चालू राहणार नाही याची काळजी घ्यावी, असे देखील या निर्णयात सांगण्यात आले आहे.
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेत्यांना मंत्रालयासमोरील बंगले दिले आहेत. मात्र चार वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार यांची ज्येष्ठता पाहता त्यांना ‘देवगिरी’ बंगला देण्यात आल्याचे मानले जात आहे.
उपमुख्यमंत्रीही राहणार आधीच्याच बंगल्यात-
दुसरीकडे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या आधीच्याच ‘सागर’ बंगल्यात राहणार आहेत. सागर बंगला त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या कार्यालयापासून आणि त्यांच्या कन्येच्या शाळेपासून जवळ असल्याने त्यांनी सागर बांगला मिळावा हि मागणी त्यांनी २०१९ मध्ये केली होती. त्यांची हि मागणी तेव्हा पूर्ण झाली होती आणि आता अजित पवार यांची मागणीही पूर्ण करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Uday Samant : उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्याबाबत विनाकारण शिवसेनेला बदनाम करू नये – नीलम गोऱ्हे
- CM Eknath Shinde : उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…!
- Uday Samant : शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट संघर्ष पेटला, उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्याप्रकरणी ५ जणांना अटक!
- CWG 2022 : पीव्ही सिंधूच्या नेतृत्वातील बॅडमिंटन संघाने जिंकले ‘सिल्वर मेडल’; वाचा सविस्तर!
- VIDEO – माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

