Share

VIDEO – माजी मंत्री उदय सामंत यांच्या वाहनावर संतप्त शिवसेना कार्यकर्त्यांनी हल्ला केला

Published On: 

पुणे : राज्यात गेल्या दीड महिन्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज शिंदे गटाते नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पुण्यात होते. यावेळी मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. आज पुण्यात या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जाहीर सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेनेचे प्रमुख आदीच्या ठाकरे यांनी एकमेकांवर नाव न घेता परस्परांवर टीका केली. तानाजी सावंत यांनी थेट कोण आदित्य ठाकरे? असा प्रश्‍न केल्याने या दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

 

शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटावर नाराज-

महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार पडल्यानंतर आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक मूडमध्ये दिसत आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही शिंदे गटावर नाराज आहेत. पुण्यातील शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. उदय सामंत यांच्या गाडीची काच फोडल्याने शिंदे गटाच्या आमदारांवर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केल्याचे पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!