Share

पुणे-बंगळुरू महामार्ग पुरामुळे बंद पडू नये म्हणून अजित पवार करणार गडकरींकडे महत्वाची मागणी

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : २१ जुलै पासून सलग तीन दिवस कोल्हापूरसह सांगली, साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. या जिल्ह्यांमध्ह्ये झालेल्या रेकॉर्डब्रेक पावसामुळे २०१९ पेक्षाही अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूरमध्ये शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश भाग हा पुराच्या पाण्याखाली गेला होता. यामुळे हजारो कुटुंबाना फटका बसला असून घरासह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे.

चौथ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर उतरण्यास सुरुवात झाली असून पूरग्रस्त भागांमधील पाणी ओसरत आहे. पूरामुळे राज्यासह कर्नाटक आणि गोव्यासाठी महत्वाचा असणारा पुणे-बंगळुरू महामार्ग हा बंद झाला होता. शिरोली भागात महामार्गावर १३ फुटांहून अधिक पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. यामुळे अत्यावश्यक मदत पुरवण्यात देखील अडथळा निर्माण झाला होता तर हजारो वाहने महामार्गावर अडकली होती.

२६ जुलै रोजी महामार्ग पुन्हा सुरु करण्यात आला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौऱ्यात महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी महत्वाची मागणी केली आहे. ‘मागील आठवड्यात पुणे-बेंगळुरू हायवे चार दिवस बंद होता. असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडे उड्डाणपुलाची मागणी करण्यात येईल. पन्हाळा मार्गावर शिवाजी पूल ते केर्ली दरम्यानही उड्डाणपूल बांधण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल,’ असं सांगतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती देखील अजित पवार यांनी दिली आहे.

अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर-सांगलीत पूर नाही !

‘मागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यावेळच्या सरकारने एक समिती नेमली होती की खरोखरच अलमट्टीमुळे या दोन जिल्ह्यांना पूर येतो का, तर या समितीचा अहवाल आला.मध्ये अलमट्टीमुळे पूर येतो असं काही म्हटलेलं नाही. पण वरची जी काही धरणं आहेत, राधानगरी, दूधगंगा, वारणा, तारळी, मुरुडी अशी अनेक छोटी मोठी धरणं आहेत. कोयना धरण महत्त्वाचं, या सगळ्या धरणांचं पाणी कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा नद्यांना जातं. ते पाणी खाली जातं. त्यावेळी तिथं वॉटर लेक होतं आणि त्याचा फटका नागरिकांना बसतो,’ असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!