Share

‘काळजी करू नका ; मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत’ – राज ठाकरे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज म्हणजेच 27 जुलैला 60 वा वाढदिवस आहे. दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये, सोशल मीडिया आणि ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे दौरा करुन मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या का? असा प्रश्न विचारला. यावर ते उत्तर देताना म्हणाले कि, ‘ मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावर भाष्य केले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धवजींच्या रूपाने राज्याला आणि महाविकास आघाडीला सक्षम,समर्थ सर्वांना सोबत घेऊन जाणारं कुशल नेतृत्वं लाभले आहे. अशी कौतुकाची थाप देत मुख्यमंत्री ठाकरेंना दीर्घायुष्य लाभण्याची प्रार्थना केली आहे.

तसेच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य कोरोनाविरुद्धचा लढा निश्चितंच जिंकेल. पुरोगामी,प्रगत विचारांचा महाराष्ट्र पुन्हा एकदा देशातील,जगातील अव्वल राज्य बनण्याचा विश्वास मुख्यमंत्री ठाकरेंवर दाखवत अजित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!