Share

‘सर्वांनी दूसरा डोस घ्या अन्यथा…’; ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे मोठे विधान

Published On: 

मुंबई: जगभरात सध्या ओमायक्रॉन (omicron) विषाणू वेगाने पसरत आहे. भारतातही अनेक रुग्ण ओमायक्रॉनचे सापडले आहेत. त्यात कोरोनाचे (corona) रुग्ण देखील आहेतच. अशा परिस्थितीत देशात तसेच राज्यात पुन्हा एकदा चिंतेचे वर्तवरण पसरत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ओमायक्रॉन संदर्भात व त्यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली.

अजित पवार म्हणाले, ओमायक्रॉनच्या बाबतीत अनेक संभ्रम असल्याने राज्य सरकार या विषाणूला गांभीर्याने घेत आहे. ओमायक्रॉन हा नवीन विषाणू असल्याने यात अनेक मतमतांतरे आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि देशातील आरोग्य विभागाने याविषयी मार्गदर्शक सूचना केल्यास लोकांमधील गैरसमज थांबतील, असं अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्याच सोबत लसीकरण करण्यावर देखील अजित पवार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

राज्यात मुंबई, पुणे यांसारख्या शहरात पहिला डोस शंभर टक्के पूर्ण होत आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज असून दुसरा डोस बाकी असणाऱ्या लोकांची संख्याही मोठी आहे. लोकांनी लसींचे दोन्ही डोस घ्यावे यासाठी सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून जनजागृती केली जात असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्याच सोबत सर्वांनी दूसरा डोस घ्यावा अन्यथा वेगळ्या प्रकारची बंधने आणून दुसरा डोस घेण्यासाठी लोकांना भाग पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!