पुणे: पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या विरोधात एट्रॉसीटीचा गुन्हा नोंद करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. देवीदास ओव्हाळ नावाच्या व्यक्तीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोथरुडमधील सार्वजनिक शौचालय ठेकेदार असलेल्या त्यांच्या भाच्याच्या मदतीने तोडल्याचा त्यांच्यावर आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर करण्यात आला आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागतील कोथरुडच्या भीमनगर भागातील नागरिक ते रहात असलेली जागा सोडून जावेत आणि त्याठिकाणी दुसरा गृहप्रकल्प उभारता यावा यासाठी महापौरांनी त्यांच्या भाच्याच्या मदतीने तेथील सार्वजनिक शौचालय तोडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर देवीदास ओव्हाळ नावाच्या व्यक्तीने हे आरोप केले आहेत. तसेच देविदास ओव्हाळ यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने गुन्हा नोंद करुन तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिलेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांना याबाबत विचारलं असता आपण सर्व माहिती घेऊन आपली बाजू मांडू असं त्यांनी म्हटल आहे.
महत्वाच्या बातम्या:
- केएल राहुल एकदिवसीय आणि टी-२० चा उपकर्णधार असणार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली माहिती
- भारतमातेने आपला सुपुत्र आणि असामान्य योद्धा गमावला आहे- चंद्रकांत पाटील
- …पण केंद्र सरकार सीमावादावर संसदेत चर्चा करण्यास तयार नाही; सोनिया गांधींचा आरोप
- लोकांच्या मनातील शंकाचे निरसण करण्याची जबाबदारी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांची- संजय राऊत
- T20 नंतर आता एकदिवशीय कर्णधारपदही हिटमॅनच्या हाती; सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

