मुंबई : टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील ( ‘Maharashtrachi Hasyajatra’) दोन विनोदवीर चर्चेत आले आहेत. ते म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार (Visakha Subhedar) आणि समीर चौघुले (Sameer Chowgule). या दोघांना अनोखी भेटवस्तू मिळाली आहे. नुकतंच या मालिकेतील कलाकारांचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी कौतुक केले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान विशाखा सुभेदार यांनी इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांच्या हातात भेटवस्तूंवर लता मंगेशकर (Singer Lata Mangeshkar) यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात शुभेच्छा संदेश लिहिलेला एक कागद दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना त्यांनी त्यांचा एक फोटोही पोस्ट केला आहे. तिने लिहिले आहे की, काय बोलू.. शब्द हरवले आणि डोळे वाहू लागले.. घरी एक पार्सल आलं आणि त्यावर एककार्ड होतं आणि चमचमत्या कागदात गुंडाळून एक ‘क्षण’ आला, जो ‘सुख’ आणि आनंद घेऊनच आला..! त्यावरचं नाव वाचलं. आणि दोन सेकंद धस्स झालं काळजात.. लता मंगेशकर..! या फोटोत त्यांच्या खांद्यावर दोन साड्या पाहायला मिळत आहे.
https://www.instagram.com/p/CXKyRz_qV3k/?utm_source=ig_web_copy_link
गानसम्राज्ञी लता मंगेशकर नेहमी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पाहतात. त्या या कार्यक्रमाच्या फार मोठ्या चाहत्या आहेत. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांचे विनोद त्यांना प्रचंड आवडतात. लता मंगेशकर यांनी कशाप्रकारे कार्यक्रमाचे कौतुक केलं याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘त्या’ व्हायरल फोटोवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया;म्हणाले,’ही महाराष्ट्राची संस्कृती नसून…’
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- बिपीन रावत यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा कायम लक्षात राहील- शरद पवार
- ‘त्यांच्या निधनामुळे मला…’, बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

