सातारा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यामध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुद्धा होताना पहायला मिळाले. तद्पश्चात अध्यक्षपदाच्या निवडी दिवशी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नितीनकाका जाधव-पाटील (Nitin Patil) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले(Shivendraraje Bhosle) यांच्यावर निशाणा साधत मी निवडून आलो असतो तर शिवेंद्रराजेंची शिफारस पवार साहेबांच्याकडे करु शकलो असतो. परंतु यावेळी माझाच पराभव झाल्यामुळे माझ्यासारख्याची शिफारस कमी पडली त्यामुळेच शिवेंद्रराजे अध्यक्ष होऊ शकले नाहीत’, असा खोचक टोला लगावला होता.
तद्पश्चात शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले की,’जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मलाच मिळावं असा माझा मुळीच अट्टाहास नव्हता. मला पाच वर्ष अध्यक्ष करण्यासाठी तुम्ही हरकत घेतली होती हे विसरलात का? शशिकांत शिंदे यांचे वक्तव्य सहानुभूती मिळवण्यासाठी असून स्वतःचं राजकारण आणि गटबाजीमुळे त्यांचा पराभव झाला आहे. त्यांनी आपली लोकं सोबत का राहिली नाहीत याचं आत्मपरीक्षण करावं. आपल्या पराभवाचं खापर माझ्यावर फोडू नये.’ तसेच पुढे ते म्हणाले की,’तुम्ही हवं तेवढं वातावरण तापवा, आम्ही तुम्हाला थंड करायला तयार आहोत. तुम्हाला थंड करून परत घरी पोहचवण्याची ताकद आमच्यात आहे.’
दरम्यान, शशिकांत शिंदे यांनी माझ्यासाठी कधीच शिफारस केली नसून मी सुरुवातीला चेअरमन झालो त्या बैठकीतसुद्धा त्यांनी माझ्या पाच वर्षांच्या चेअरमनपदाला विरोध दर्शविला होता, असेही शिवेंद्रराजे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- बिपीन रावत यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा कायम लक्षात राहील- शरद पवार
- ‘त्यांच्या निधनामुळे मला…’, बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- …त्यांनी केलेली भारतमातेची सेवा राष्ट्र कायम स्मरणात ठेवेल- देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

