Share

चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी विमानात मला जागा ठेवा; अजित पवारांची टोलेबाजी

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि इतर नेते देखील उपस्थित असतील. चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावरून शिवसेना आणि राणेँमध्ये श्रेयवाद देखील चांगलाच रंगलेला पाहायला मिळाला आहे.

या विमानतळाच्या उद्घाटनावरून आज मुंबईतील एका कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, ‘सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं काम आता पुर्ण झालंय. या चिपी विमानतळावर आता एक पुस्तकचं लिहायला पाहिजे, किती टर्म चिपी चिपी चाललं. पण चिपी काही पुर्ण होईना. दरम्यान, मुंबई ते सिंधदुर्ग विमानसेवा ९ तारखेला सुरु होत आहे.’

पुढे ते म्हणाले, ‘चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आम्ही पण मुख्यमंत्र्याबरोबर जात आहोत. आताच त्यांना सांगितल विमानात मला जागा ठेवा,’ अशी मिश्किल टिपण्णी अजित पवार यांनी केली. यासोबतच, ‘विमानसेवेचा फायदा कोकणच्या पर्यटन वाढीस होईल. गोव्याकडे जाणारे पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात कोकणाकडे वळतील,’ असा विश्वास देखील अजित पवार यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!