मुंबई : आज(२७ सप्टें.)जागतिक पर्यटन दिन यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘आगामी काळात पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून करु’ असे ठाकरे म्हणाले आहेत.
World Tourism Day – LIVE https://t.co/WyztgblVC0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 27, 2021
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की,’पर्यटन विभागाने डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा लवकर सुरू करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक त्या रेल्वे किंवा विमानात घेऊ. पण थोरात साहेब आपल्यावर जबाबदारी असेल की या प्रवासाच्या काळात आपल्याला बैठक संपवावी लागेल. कारण आता जग वेगवान आहे. आपण तिथं पोहचून परती प्रवास सुरू झाला तरी आपली कॅबिनेट संपली नाही तर पंचायत होईल. आपण हे आव्हान घेतलं पाहिजे. डेक्कन ओडीसीमध्ये कॅबिनेट नक्की करणार आहोत’.
दरम्यान, ‘लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका पर्यटनाला बसला. या काळात निर्बंध असतानाही नवे धोरणं आणली, नव्या सुविधा निर्माण केल्या, नवे रोजगार तयार केले त्यासाठी मी पर्यटन विभागाचे मंत्री, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. आजचे फोटो प्रदर्शन महाराष्ट्राच्या वैभवाचे ऐश्वर्यचे प्रदर्शन आहे. दुर्दैवाने या खात्याकडे लक्ष दिले गेले नाही. आता त्याला चांगले महत्त्व देण्यात येत आहे’ असे मत ही ठाकरेंनी यावेळी व्यक्त केले.
महत्त्वाच्या बातम्या
- १ ऑक्टोबरपासून बँकेतील नियमासह ‘या’ पद्धतीत होणार बदल
- पायातून रक्त वाहत असतानाही सीएसकेचा ‘हा’ खेळाडू मैदानावरून हटला नाही; फोटो व्हायरल
- पंकजा मुंडेंना धक्का! ‘वैद्यनाथ’ साखर कारखान्याचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश
- ‘ऊसतोड कामगार हा राजकारणाचा विषय नव्हेच, श्रेयासाठी मी काम केले नाही!’, पंकजांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला
- राज्यसभा पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या रजनी पाटील यांचे चंद्रकांतदादांनी केले अभिनंदन


