Share

Ajit pawar | अडेलतट्टूपणाची भूमिका न घेता सर्वोतोपरी मदत करावी- अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

वर्धा : विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सध्या अतिवृष्टी आणि पुरस्थितीने बाधित जिल्ह्यांची पाहणी करण्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक भागांची पाहणी करून ग्रामस्थांच्या आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या परिस्थतीचा जवळून आढाव घेतला आहे. या दौऱ्यानंतर आज माध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारपुढे शेतकऱ्यांची बाजू मांडली आहे. “नियम-अटी, आणि विविध निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी”, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने अजूनपर्यंत नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि पंचनामे करायला सुरुवात देखील केलेली नाही. त्यामुळे याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले कि, “सरकारने आता पंचनामे करण्याची औपचारिकता करू नये. झालेल्या नुकसानाची गंभीरता ओळखून त्वरित आणि सरसकट मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करावी आणि महत्वाची बाब म्हणजे पंचनामे करायचेच असतील तर त्वरित करावेत कारण नुकसानाचे वेळेत पंचनामे झाले नाहीत तर नुकसानाची गंभीरता लक्षात येणार नाही. त्यामुळे जर पंचाने करण्यास आणखी विलंब केला तर खरी परिस्थिती समोर येणार नाही. शेत शिवरांचे चित्र हे अतिशय भीषण आहे.”

शेतकऱ्यांनी पावसाळा सुरु झाल्यावरच पेरण्या केल्या होत्या. मात्र हे बी-बियाणं आणि उगवलेली रोपं अतिवृष्टीत वाहून गेली त्यामुळे या परिस्थितीवर उपाय सांगताना अजित पवार म्हणाले कि, “आधीची पीक-पेरणी वाहून गेल्यामुळे आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. त्यासाठी कमी कालावधीत उत्पादन देणारी पीक द्यावी लागतील. ज्यात तूर, हरभरा अशी बियाणं द्यावी लागतील. तसेच लाखाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याबाबत कोणतीही अडेलतट्टूपणाची भूमिका न घेता मदत करावी.” पुढे बोलताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील केली. “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच सगळं काही करत आहेत. पण आम्ही त्यांना सांगू कि तुमच्या जोडीला आणखी काही सहकारीही घ्या आणि जर दोघांनाच हे सगळं पेलवायचं असेल तर त्यांनी ते पेलवावं. मात्र प्रत्येक नुकसानग्रस्थ नागरिकांना, शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत झालीच पाहिजे”, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

गडचिरोली जिल्याची पाहणी

गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी अहेरी, सिरोंचा आणि भामरागड या भागाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे साधारणपणे दहा लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यातील २५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना सरकारने एसडीआरएफचे निकष बाजूला ठेवून हेक्टरी पाऊण लाखाची मदत द्यावी, बिगर शेतकरी घटकाला आणि गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दगावलेल्या १२ व्यक्तींच्या कुटुंबियांनाही राज्य सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी अजित पवार यांनी गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत केली होती.

ओला दुष्काळ जाहीर करावा
राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यासाठी त्वरित विधिमंडळाचे अधिवेशन घ्यावे, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. केवळ दोन व्यक्तींनी मुंबईत बसून राज्य चालवणे आणि सर्व जिल्हांना पालकमंत्री देऊन काम करणे यात मोठा फरक आहे, ही वस्तुस्थिती अजित पवार यांनी माध्यमांपुढे मांडली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!