Share

Ajit Pawar | “मला गृहमंत्री व्हायचं होतं. मात्र, वरिष्ठांनी…”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्याचबरोबर सध्या निवडणुकांचही वारं घुमू लागलं आहे. सर्व पक्षांनी आगामी  निवडणुकांसाठीची तयारी देखील सुरू केली असून, याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही दौरे सुरू केले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी आपल्या मनातील एक खंत व्यक्त केली असल्याचं समजतं आहे.

काय म्हणाले अजित पवार ?

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मला गृहमंत्री पद हवं होतं, असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. पुण्यात शहर कार्यकारणीच्या बैठकीत पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. मला उपमुख्यमंत्री बनवल्यानंतर मी वरिष्ठांकडे गृहखात्याची मागणी केली होती. मात्र, अनिल देशमुख यांना गृहमंत्री बनवण्यात आले.

त्यानंतर मी पुन्हा मागणी केली. तेव्हाही दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्री बनवण्यात आहे. कदाचित वरिष्ठांना वाटत असेल की याला गृहमंत्री बनवले तर हा आपलंही ऐकणार नाही, त्यामुळे मला गृहखातं दिलं नसेल, असं अजित पवार यांनी सांगितलं.

मला जे योग्य वाटत, तेच मी करतो-

तसेच अजित पवार सांगितले की, मला जे योग्य वाटत, तेच मी करतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता जरी चुकला तरी त्याला माफी नाही. माझ्याकडे सर्वांसाठी नियम सारखा आहे. एखादा कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर मी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभा असेल. मात्र, तोच जर चुकत असेल तर त्याला पाठिशी घालण्यात अर्थ नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!